Jio IPO: भारतातील सर्वात मोठ्या IPO साठी Jio चा सेबीकडे अर्ज! Meta-Googleचाही विश्वास; अंबानींचा मास्टरप्लॅन काय?

Jio IPO Explained: जिओ प्लॅटफॉर्म्सने ३७ हजार कोटी रुपयांच्या मेगा IPO साठी सेबीकडे डीआरएचपी दाखल केला असून, हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO ठरू शकतो.
Ambani Files for India’s Biggest IPO

Jio IPO Shocker! Ambani Files for India’s Biggest IPO – Why Are Meta & Google Betting Big?

eSakal

Updated on

Reliance Jio IPO: रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि दूरसंचार क्षेत्रातील उपकंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सने आपल्या बहुचर्चित आयपीओसाठी आज भांडवल बाजार नियामक ‘सेबी’कडे ‘डीआरएचपी’ (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) दाखल केला. हा ३७ हजार कोटी रुपयांचा IPO देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ मानला जात असून, या निधीमुळे ‘जिओ’चे बाजारमूल्य सुमारे १३७ अब्ज डॉलर इतके होण्याची अपेक्षा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४९ व्या वार्षिक भागधारक बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी या IPO ची घोषणा केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com