Stock Market: Jio IPO की Reliance चे शेअर्स? तुमच्याकडे 14,000 रुपये असतील तर कुठे गुंतवणं फायद्याचं? तज्ज्ञ काय सांगतात

Should You Apply for Jio IPO or Buy Reliance Shares: जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO ला मिळालेला प्रतिसाद आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमधील हालचालींमुळे गुंतवणूकदारांसमोर कोणता पर्याय निवडावा, असा प्रश्न आहे. पाहा तज्ज्ञांचे अंदाज काय सांगतात...
Jio IPO or Reliance Shares

Jio IPO vs Reliance Shares: Where Should You Invest ₹14,000? Experts Explain

eSakal

Updated on: 

Jio IPO or Reliance Industries Shares best investment: जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद मिळत असताना रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही वाढ होताना दिसून आलं. बुधवारी रिलायन्सचा शेअर 0.50% पेक्षा अधिक वाढीसह ₹1,209 वर बंद झाला. दुसरीकडे, जिओ प्लॅटफॉर्म्सचा IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला झाल्यानंतर अवघ्या एका तासात पूर्णपणे सबस्क्राइब झाला. त्यामुळे आता अनेक किरकोळ गुंतवणूकदारांसमोर प्रश्न आहे की 14,000 रुयए असतील तर जिओच्या IPO मध्ये पैसे गुंतवावेत की रिलायन्सचे शेअर्स खरेदी करावेत?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com