How to Identify Fake Currency: अशा ओळखा बनावट नोटा आणि नुकसान टाळा

बनावट नोटा कशा ओळखाव्या यासाठीच आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही या फसवणूकीपासून Cheating वाचू शकता
Fake Currency Identification
Fake Currency IdentificationEsakal

Fake Currency Identification: आपण अनेकदा ऐकलं असेल की फेक करन्सी Fake Currency म्हणजेच बनावट नोटा बाजारात येऊ लागल्या आहेत.

बनावट नोटा ही एक मोठी समस्या भारतच नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्ये बनावट नोटांमुळे अर्थव्यस्थेवर Economy परिणाम होताना दिसतो. या फेक नोटांमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होतं. Know How to Identify Fake Notes

सोबतच यामुळे काळाबाजारBlack Marketing आणि गुन्हेगारी Crime वाढण्यास प्रोत्साहन मिळतं. त्यामुळेच बनावट नोटा ओळखून त्या आपल्याकडे येणार नाहीत याची काळजी घेणं गरजेच आहे. विचार करा जर तुमच्याकडे अशा फेक नोटा आल्या तर काय कराल.

महत्वाची बाब म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला या नोटा Currency बनावट आहेत कि खऱ्या हे ओळखणं गरजेचं आहे. बनावट नोटा कशा ओळखाव्या यासाठीच आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही या फसवणूकीपासून Cheating वाचू शकता. How To Identify Fake Currency

अॅपच्या मदतीने बनावट नोटा ओळखा

RBI ने 'RBIअॅप' लॉन्च केलं आहे. या अॅपचा उपयोग नोटा ओळखण्यासाठी केला जातो. हे अॅप कॅमेऱाच्या मदतीने करंसीला स्कॅन करतं. नोट स्कॅन झाल्यानंतर ती बनावट आणि की खरी हे अॅपच्या मदतीने लगेचच लक्षात येतं. Fake Currency Notes

त्याचसोबत Chkfake या अॅपच्या मदतीने ही बनावट नोटा ओळखणं शक्य आहे. हे अॅप iOS आणि एंड्राइड दोन्ही युजर्ससाठी फ्रीमध्ये उपलब्ध आहे. हे अॅप केवळ भारताचं चलनच नव्हे तर इतर वेगवेगळ्या देशातील करंसीबद्दल माहिती पुरवण्यास सक्षम आहे. यासाठी फक्त तुम्हाला डेनोमिनेशन सर्च करायचं आहे.

त्यानंतर अॅपमधील काही स्टेप्स फॉलो करून वेरिव्हिकेशन प्रोसेस पूर्ण करायची आहे. इथं तुम्हाला विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. त्यानंतर हे अॅप तुमच्याकडे असलेली नोट खरी आहे की बनावट हे सांगेल. अॅप शिवाय काही इतर गोष्टींची पडताळणी करूनही तुम्ही नोट बनावट आहे का हे ओळखू शकता. 

हे देखिल पहा

Fake Currency Identification
बनावट नोटांचे नियम काय आहेत; किती शिक्षा होऊ शकते? |Fake Currency

गांधीजींचा फोटो

भारतीय चलनामध्ये महात्मा गांधीजींच्या फोटोवर वॉटरमार्क आहे. हे वॉटरमार्क तुम्हाला नोट ओळखण्यासाठी मदत करत. बनावट नोटा बनवणारे हे वॉटरमार्क तयार करण्यासाठी हेवी ऑइल किंवा ग्रीसचा वापर करतात. त्यामुळे हा वॉटरमार्क नॉर्मलपेक्षा काही अंशी जाड दिसतो. त्यामुळे कुणाकडूनही पैसे घेताना वॉटरमार्क निरखून पहा.

मायक्रो प्रिंटीग

खऱ्या भारतीय नोटांवर मायक्रोप्रिंटिंग पाहायला मिळते. हा अतिशय लहान मजकूर असून तो उघड्या डोळ्यांनी वाचणं कठीण आहे. ही मायक्रोप्रिटिंग वेगवेगळ्या भागात आढळते.  जसं की गांधीजींचा फोटो, वॉटरमार्क, सुरक्षा धागा जर ही मायक्रोप्रिंटिंग नसेल किंवा अस्पष्ट असेल तर नोट बनावट असण्याची शक्यता असते. 

फॉर्मेटिंग

भारतीय चलनातील काही संख्यात्मक आकडे बनावट नोटा ओळखण्यास मदत करू शकतात. बनावट नोटांमध्ये या नंबर्सची फॉर्मेटिंग योग्य प्रकारे नसते. बऱ्याचदा दोन आकड्य़ांमध्ये कमी जास्त अंतर असू शकतं. तर हे आकडे देखील लहान मोठे दिसू शकतात. हे आकडे निरखून पाहिल्यास नोट ओळखणं शक्य होईल. 

सुरक्षा धागा शोधा

सर्वच भारतीय नोटांमध्ये एक सुरक्षा धागा असतो जो नोटेमधून उभा जातो. प्रकाशामध्ये नोट धरल्यास हा धागा स्पष्टपणे दिसतो. या धाग्यावरही नोटेचं मूल्य छापलेलं असतं. जर हा सुरक्षा धाना नसेल किंवा या धाग्यावरील मूल्य चुकीचं असल्यास नोट बनावट असू शकते. 

सी-थ्रू रजिस्टर तपासा

सी-थ्रू रसिजस्टर ही नोटेच्या डाव्या बाजूला असलेली छोटी विंडो असते. या विंडोमध्ये एक मूल्यवर्ग अंक छापण्यात आलेला असतो. जो नोटेच्या दोन्ही बाजूंनी दिसतो. जर हा अंक नसेल किंवा चुकीचं मूल्य छापलेलं असेल तर नोट फेक असू शकते. 

फ्लोरोसेंट धागा तपासा

आरबीआय एका फ्लोरोसेंट धाग्याने नोटा छापते. हे धागे अल्ट्राव्हायोलेट प्रकाशात चमकतात. हा धागा कागदामध्येच एम्बेड केलेला असतो. जर हा धागा नसेल किंवा युवी प्रकाशात चमकत नसेल तर नोटेमध्ये गडबड आहे हे लक्षात घ्या.How To Identify Fake Currency

रंग बदलणारी शाई

आरबीआय चलनी नोटांवर रंग बदलणाऱ्या शाहीचा वापर करते. १०० रुपये आणि त्याहून वरच्या नोटांवर अशी शाई वापरण्यात येते. त्यामुळे जेव्हा तुम्ही नोट खालच्या बाजुला थोडी दुमडता तेव्हा अंकांचा रंग हिरव्या एवजी निळा दिसू लागतो. त्यामुळेच जर अंकांचा रंग बदलत नसेल तर नोट फेक असण्याची शक्यता असते.

कागदाची गुणवत्ता तपासा

भारतीय नोटा या उच्चप्रितीच्या विशिष्ट प्रकारच्या कागदांवर छापल्या जातात. त्यामुळेच जर कागदाची गुणवत्ता चांगली नसेल किंवा त्याचा पोत जो स्पर्श केल्यावर जाणवतो तो योग्य नसेल तर नोट बनावट असू शकते. 

स्पेलिंगही तपासा

अनेकदा बनावट नोटा बनवणाऱ्यांकडून नोटेवर चुकिचं स्पेलिंग छापलं जातं. म्हणूनच नोटांवर असलेले आकडे किंवा इतर स्पेलिंग नीट तपासून पहा.

या काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही देखील बनावट नोटा ओळखू शकता. त्यामुळेच एखादी मोठी रक्कम जर तुम्ही स्विकारत असाल तर नोटांकडे लक्षपूर्वक तपासणी करा. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com