Gautam Adani : हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतरही LIC चा अदानींवर विश्वास कायम, घेतला मोठा निर्णय

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहामध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांवरही प्रश्न उपस्थित झाले होते.
Gautam Adani
Gautam AdaniSakal

Gautam Adani : उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी 2023 हे वर्ष चांगले राहिले नाही. अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. अदानी समूहाचे मार्केट कॅप 100 बिलियन डॉलरच्या खाली घसरले आहे.

तर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 127 बिलियन डॉलर वरून 37 बिलियन डॉलरवर घसरली आहे. श्रीमंतांच्या यादीत अदानी यांची मोठी घसरण झाली आहे. हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदानी समूहामध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांवरही प्रश्न उपस्थित झाले होते.

एलआयसीच्या अदानी समूहातील गुंतवणुकीवरून गदारोळ होऊनही विमा कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.

विरोधाला न जुमानता गुंतवणूक वाढवली :

अदानींच्या कंपन्यांमध्ये एलआयसीच्या गुंतवणुकीवर बराच गदारोळ झाला, पण एलआयसीचा अदानी समूहावर विश्वास कायम आहे. विरोध आणि गदारोळानंतरही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने अदानी समूहाच्या चार कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी वाढवली आहे.

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर विरोधी पक्षांनी एलआयसीच्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण संधीचा फायदा घेत एलआयसीने अदानीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेतला.

3.57 लाख शेअर्स खरेदी केले :

अदानी समूहाने कंपन्यांमधील हिस्सेदारी वाढवली आहे. मार्च तिमाहीत, LIC ने अदानी समूहाची प्रमुख कंपनी Adani Enterprises चे 3,57,500 शेअर्स खरेदी केले. विशेष बाब म्हणजे एलआयसीने ही गुंतवणूक अशा वेळी केली जेव्हा शेअर्सच्या किंमती अर्ध्याहून अधिक घसरल्या होत्या.

या गुंतवणुकीनंतर अदानी समूहाच्या शेअर्समधील एलआयसीची हिस्सेदारी 4.26 टक्क्यांपर्यंत वाढली. डिसेंबर 2022 पर्यंत ही गुंतवणूक 4.23 टक्के होती. अदानी एंटरप्रायझेस व्यतिरिक्त आणखी तीन शेअर्समध्ये एलआयसीची गुंतवणूक वाढली आहे.

Gautam Adani
Adani Group: फायनान्शियल टाइम्सच्या लेखावर अदानी समूहाचे स्पष्टीकरण; म्हणाले, पत्रकारांनी...

एलआयसीने अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन गॅस आणि अदानी पोर्टमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एलआयसीने अदानींच्या एसीसी आणि अंबुजा सिमेंट या सिमेंट कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी कमी केली आहे.

या गुंतवणुकीनंतर अदानींच्या कंपन्यांमधील एलआयसीची गुंतवणूक वाढली. अदानी एंटरप्रायझेसमधील हिस्सा 4.26 टक्क्यांवर गेला. अदानी ट्रान्समिशनमधील भागीदारी वाढून 3.68 टक्के झाली.

तर अदानी ग्रीनचा हिस्सा 1.28 टक्क्यांवरून 1.35 टक्क्यांवर पोहोचला आहे. नवीन गुंतवणुकीनंतर एलआयसीने अदानी टोटलमधील आपला हिस्सा 5.96 टक्क्यांवरून 6.02 टक्क्यांवर वाढवला आहे.

Gautam Adani
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com