
LIC Share Price Falls: एलआयसीच्या शेअर्समध्ये गुरुवारी घसरण पाहायला मिळाली. यामागचं मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारकडून एलआयसीमधील हिस्सेदारी आणखी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार ऑफर फॉर सेल (OFS) च्या माध्यमातून एलआयसीमधील काही शेअर्स विकणार आहे.
याआधी 2022 मध्ये जेव्हा एलआयसीचा आयपीओ आला होता, तेव्हाही सरकारने केवळ 3.5 टक्के हिस्सेदारी विकली होती. आता पुन्हा सरकारने आपली हिस्सेदारी कमी करण्यास मंजुरी दिल्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.