
अमेरिकेने भारतावर लादलेल्या अतिरिक्त 25% टॅरिफमुळे भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला.
सेन्सेक्स 270 अंकांनी घसरून 79,809 वर, तर निफ्टी 74 अंकांनी घसरून 24,426 वर बंद झाला.
तीन दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल 11.16 लाख कोटींचे नुकसान.
Stock Market Closing Today: भारतीय शेअर बाजारांमध्ये आज सप्टेंबर महिन्याची सुरुवात घसरणीसह झाली. दिवसभर घसरणीसह व्यवहार केल्यानंतर, शेअर बाजारातील घसरण आणखी वाढली. सलग तिसऱ्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला. निफ्टी 74 अंकांनी घसरून 24,426 वर बंद झाला. सेन्सेक्स 271अंकांनी घसरून 79,809 वर आणि बँक निफ्टी 164 अंकांनी घसरून 53,655 वर बंद झाला.