
Share Markets Ignore Global Crises: जगभरात युद्धाचे ढग दाटले आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरुच आहे. युक्रेन-रशियाबद्दल तोडगा निघता निघेना, भारत-पाकिस्तान तणाव पुन्हा वाढलाय. ट्रम्प तात्या आहेतच पण तरी शेअर बाजार मात्र निवांत आहे, उलट भराऱ्या घेतोय.
युद्ध, एखादा सणकी राष्ट्रप्रमुख आणि त्याची धोरणं, दोन दोषांतल्या जुन्या वैराला नवी हवा... असं सगळं झाल्यावर शेअर बाजारात उलथापालथ होईल असं वाटतं. पण तसं होत नाहीये. उलट, जगभरातील आणि भारतातील शेअर बाजार तेजीत आहेत.
ही परिस्थिती पाहून गुंतवणूकदारही गोंधळले आहेत. त्यांनाही कळत नाही की नेमकं शेअर बाजारात काय होतंय? पण जगभरात भू राजकीय तणाव असताना शेअर बाजार तेजीत असण्याची अनेक कारणे आहेत. याची चर्चा या विशेष लेखात करूया...आधी जरा परिस्थितीवर नजर टाकू.