
Stock Market Investor Alert: गेल्या दोन आठवड्यांपासून शेअर बाजारात प्रचंड हालचाल सुरू आहे. कंपन्यांचे प्रवर्तक (Promoters), प्रायव्हेट इक्विटी (PE) आणि व्हेंचर कॅपिटल (VC) गुंतवणूकदार जोरदार विक्री करत आहेत. आतापर्यंत तब्बल 40,000 कोटी रुपयांचे शेअर्स विकले गेले आहेत. त्यामुळे बाजारात तेजी टिकून राहील का, की घसरण सुरू होईल, यावर चर्चा सुरू झाली आहे.