
Motilal Oswal Wealth: सध्या देशभरात लग्नाचा हंगाम सुरू असून नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान देशभरात एकूण 48 लाख विवाहसोहळे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 6 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होणे अपेक्षित आहे.
अशा परिस्थितीत या लग्नसराईचा फायदा कोणत्या कंपन्यांना होणार? मोतीलाल ओसवाल वेल्थ मॅनेजमेंटने अशा पाच शेअर्सची नावे गुंतवणूकदारांना सुचवली आहेत जे येणाऱ्या काळात वाढू शकतात. कारण या कंपन्यांना या लग्नाच्या हंगामात मोठा फायदा होऊ शकतो.