
थोडक्यात:
MP Materials Corp ही अमेरिका स्थित दुर्मिळ धातूंची कंपनी असून तिच्या शेअरमध्ये 4 दिवसांत 100% वाढ झाली आहे.
ग्रीन टेक्नोलॉजी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे रेअर अर्थ मटेरियल्सची मागणी वाढत आहे.
अमेरिका चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात असून MP Materials यामध्ये मोठी भूमिका बजावत आहे.
Mp Materials Stock: MP Materials ही अमेरिका स्थित एक मोठी कंपनी आहे, ही कंपनी Rare Earth Elementचे उत्खनन आणि प्रक्रिया करण्याचं काम करते. या धातूंचा वापर इलेक्ट्रिक वाहने, स्मार्टफोन, विंड टरबाईन आणि संरक्षण क्षेत्रातील उपकरणांत मोठ्या प्रमाणावर होतो. कंपनीचं ‘माउंटन पास माइन’ हे अमेरिका देशातील एकमेव धातूची खाण आहे. विशेषतः नियोडिमियम आणि प्रासियोडिमियम या धातूंवर कंपनी लक्ष केंद्रित करत आहे.