Multibagger Stock: गुंतवणूकदार होणार मालामाल! भारतातील आघाडीची कंपनी देणार बोनस शेअर्स, रेकॉर्ड तारीख जाहीर

Multibagger Stock: कंपनीने कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळवून दिला आहे.
Multibagger Small Cap Pharma Jeena Sikho Lifecare bonus share
Multibagger Small Cap Pharma Jeena Sikho Lifecare bonus share Sakal
Updated on

Multibagger Stock: शेअर बाजारात तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर जीना सिखो लाइफकेअरच्या (Jeena Sikho Lifecare) शेअर्सवर फोकस करु शकता. या शेअर्सने कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळवून दिला आहे.

आता कंपनीच्या संचालक मंडळाने 4:5 च्या प्रमाणात शेअरधारकांना बोनस शेअर्स मंजूर केले आहेत. नुकतेच हे शेअर्स 1.76 टक्क्यांच्या वाढीसह 1210 रुपयांवर बंद झाले. या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,225 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 140 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 1,671 कोटी आहे.

Multibagger Small Cap Pharma Jeena Sikho Lifecare bonus share
Vijayadashami 2023: विजयादशमी आर्थिक गुंतवणुकीचे धडे देणारा सण

कंपनी प्रत्येकी 10 रुपयांच्या प्रत्येक 5 विद्यमान इक्विटी शेअर्ससाठी प्रत्येकी 10 रुपयांचे 4 बोनस इक्विटी शेअर्स देईल असे कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे. यासाठी मंगळवार, 02 नोव्हेंबर 2023 ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. जीना सिखो लाइफकेअर ही भारतातील आघाडीच्या आयुर्वेदिक आरोग्य सेवा प्रोव्हायडर्सपैकी एक आहे. ही कंपनी गेल्या दहा वर्षांपासून हेल्थकेअर सर्व्हिसेज देत आहे.

जीना सिखो लाइफकेअर शेअर्सचा आरओई 41.1 टक्के आणि आरओसीई 52.7 टक्के आहे. शेअरने 140 रुपये प्रति शेअर या 52 आठवड्यांच्या नीचांकी वरून 774 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला.

Multibagger Small Cap Pharma Jeena Sikho Lifecare bonus share
Home Loan: सणासुदीच्या काळात गृहकर्जावर होणार मोठी बचत, सरकार 'या' पाच योजनांवर देत आहे अनुदान

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com