Multibagger Stock: 'या' स्टील कंपनीकडून गुंतवणूकदारांना दमदार परतावा, 14 रुपयांचा शेअर पोहोचला 1,300 रुपयांवर

गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 9.64% वाढ झाली आहे.
Multibagger Stock
Multibagger StockSakal

Multibagger Stock Update:  एपीएल अपोलो ट्यूब्स (APL Apollo Tubes) ही मिडकॅप कंपनी असून तिचे मार्केट व्हॅल्यू 36.53 हजार कोटी रुपये आहे. स्टील सेक्टरमधील या कंपनीने गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 7 पटीहून अधिक परतावा दिला आहे.

त्याच वेळी, गेल्या 12 वर्षांत त्याने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात सुमारे 93 पटींनी वाढ केली आहे. यादरम्यान, त्याच्या शेअर्सची किंमत 14 रुपयांवरून 517 रुपयांवर पोहोचली आहे. सध्या हे शेअर्स 1,317.10 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

पण, सुमारे 12 वर्षांपूर्वी, डिसेंबर 2011 मध्ये एपीएल अपोलो ट्यूब्सच्या शेअर्सने एनएसईवर पहिल्यांदा ट्रेड करायला सुरुवात केली तेव्हा त्याची किंमत फक्त 14.06 रुपये होती.

तेव्हापासून त्याचे शेअर्स सुमारे 9,267.71 टक्क्यांनी वाढले आहेत. म्हणजे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 12 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि ती गुंतवणूक कायम ठेवली असती तर 1 लाखाची किंमत 9,267.71% ने वाढून सुमारे 93.67 लाख रुपये झाली असती.

Multibagger Stock
BSE : बीएसई ने साजरा केला १४९ वा स्थापना दिन; नवीन लोगोचे अनावरण

एपीएल अपोलो ट्यूब शेअर्सची चांगली कामगिरी अजुनही सुरूच आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 9.64% वाढ झाली आहे.

त्याच वेळी, गेल्या एका वर्षात त्याच्या शेअर्सच्या किमतीत 50.64 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गेल्या 3 वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 640% परतावा दिला आहे.

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने एपीएल अपोलो ट्यूब्सच्या शेअर्सवर 'बाय' रेटिंग कायम ठेवली आहे आणि 1,490 रुपयांचे टारगेट दिले आहे. ब्रोकरेज फर्म आनंद राठीनेही 1,500 रुपयांच्या टारगेटसह स्टॉकला 'बाय' रेटिंग दिले आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Multibagger Stock
Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com