Multibagger Stocks: 4 वर्षात गुंतवणूकदार झाले मालामाल! 8 रुपयांचा शेअर पोहचला 800 रुपयांवर; तुमच्याकडे आहे का?

Multibagger Stocks: तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल, तर तुम्ही टिन्ना रबर आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. या कंपनीने गुंतवणूकदारांना अल्पावधीत चांगला परतावा दिला आहे. फक्त चार वर्षात कंपनीचे शेअर्स 8 रुपयांवरून 800 रुपयांपर्यंत वाढले आहेत.
multibagger stock tinna rubber and infrastructure limited share price increased
multibagger stock tinna rubber and infrastructure limited share price increasedSakal

Multibagger Stocks: तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल, तर तुम्ही टिन्ना रबर आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. या कंपनीने गुंतवणूकदारांना अल्पावधीत चांगला परतावा दिला आहे. फक्त चार वर्षात कंपनीचे शेअर्स 8 रुपयांवरून 800 रुपयांपर्यंत वाढले आहेत.

या शेअरने गुंतवणूकदारांना फक्त चार वर्षात 9,817 टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स 30 एप्रिल 2020 रोजी फक्त 8.45 रुपये प्रति शेअर होते, जे आज 828 रुपयांवर पोहोचले आहेत.

multibagger stock tinna rubber and infrastructure limited share price increased
Employee Count: आर्थिक मंदीची चाहूल? देशातील आघाडीच्या टॉप 3 आयटी कंपन्यांमध्ये 63,759 कर्मचारी झाले कमी

या शेअरमध्ये चार वर्षांपूर्वी कोणी एक लाख रुपये गुंतवले असते तर आज एक लाख रुपयांची रक्कम सुमारे एक कोटी रुपये झाली असती. यासोबतच एखाद्याने वर्षभरापूर्वी गुंतवणूक केली असती तर त्याला 4 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळाली असती. पाच वर्षांपूर्वी ज्यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली ते आज 49 लाख रुपयांचे मालक झाले असते.

टिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही भारतातील 40 वर्षांहून अधिक जुनी टायर मटेरियल रिसायकलर कंपनी आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, तिचे देशभरात 5 प्लांट आहेत, जिथून ती मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करते.

ऑक्टोबर 2020 मध्ये, टीना रबर आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या एका शेअरची किंमत 7.85 रुपये होती. 2023 मध्ये शेअरची किमत 434 रुपये होती. याचाच अर्थ या काळात गुंतवणूकदारांच्या पैशात 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

multibagger stock tinna rubber and infrastructure limited share price increased
Tata Sons: टाटा सन्सने ठोठावला आरबीआयचा दरवाजा; आयपीओ बाबत घेणार मोठा निर्णय

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com