

Multibaggers Stock
Sakal
High Return Stock : शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मागच्या फक्त सात महिन्यांत मालामाल केल आहे. मार्च ते नोव्हेंबर 2025 या सात महिन्यांत भारतीय शेअर बाजारातील Nifty500 मधील काही निवडक शेअर्सनी गुंतवणूकदारांना जबरदस्त रोलर-कोस्टर राइड दिली आहे.
ACE Equity च्या अहवालानुसार Nifty500 मध्ये 14 अशा कंपन्या आहेत ज्यांच्या शेअर्समध्ये 70% ते 140% पर्यंत वाढ झाली आहे. मागच्या वर्षभरात बाजारात मोठे चढ-उतार झाले असूनही या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये मात्र वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या 14 पैकी 5 शेअर्सनी गुंतवणूकदारांची संपत्ती फक्त सात महिन्यांत दुप्पटीहून जास्त केली आहे.