Upcoming IPO: ‘आयपीओं’ची पुन्हा बरसात! आठवड्यात सहा कंपन्या दाखल होणार

Upcoming IPO: सध्या शेअर बाजारात येणाऱ्या प्राथमिक शेअर विक्री योजनांची (आयपीओ) संख्या मोठी असून, गुंतवणूकदारांनी विविध क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होत आहे. चालू आठवड्यात, सहा कंपन्यांचे आयपीओ दाखल होणार असून, यात मेनबोर्ड विभागातील एक आणि एसएमई विभागातील पाच कंपन्यांचा समावेश आहे.
Nova Agritech Brisk Technovision Delaplex Phonebox Harshdeep Hortico And Megatherm Induction Ipo To Open This Week
Nova Agritech Brisk Technovision Delaplex Phonebox Harshdeep Hortico And Megatherm Induction Ipo To Open This Week Sakal

Upcoming IPO: सध्या शेअर बाजारात येणाऱ्या प्राथमिक शेअर विक्री योजनांची (आयपीओ) संख्या मोठी असून, गुंतवणूकदारांनी विविध क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होत आहे. चालू आठवड्यात, सहा कंपन्यांचे आयपीओ दाखल होणार असून, यात मेनबोर्ड विभागातील एक आणि एसएमई विभागातील पाच कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात सात आयपीओ दाखल झाले आहेत.

मुख्य शेअर बाजारात नोंदणी होणारा नोवा अॅग्रीटेकचा आयपीओ २३ जानेवारीला खुला होणार असून, तो  २५ जानेवारीला बंद होईल. प्रति शेअर किंमत ३९ ते ४१ रुपये असून,  गुंतवणूकदार किमान ३६५ शेअरसाठी आणि त्यानंतर त्या पटीत बोली लावू शकतात.

एसएमई विभागात ब्रिस्क टेक्नोव्हिजन, डेलाप्लेक्स, फोनबॉक्स, हर्षदीप हॉर्टिको आणि मेगथर्म इंडक्शन या कंपन्यांचा समावेश आहे.  ब्रिस्क टेक्नोव्हिजनचा आयपीओ २३ जानेवारीला खुला होणार आहे, तर फोनबॉक्स आणि डेलाप्लेक्सचा आयपीओ २४ जानेवारी रोजी खुले होतील. हर्षदीप हॉर्टिको आणि मेगाथर्म इंडक्शनचे आयपीओ २५ जानेवारीला खुले होतील.

यापैकी मेगाथर्मचा आयपीओ सर्वांत मोठा असून, तो ५४ कोटी रुपयांचा आहे. कंपनीने प्रति शेअर १०८ रुपये किंमत निश्चित केली असून, ४९.९ लाख शेअर जारी करणार आहे. डेलाप्लेक्सचा ४६ कोटी रुपयांचा आयपीओ या आठवड्यातील दुसरा सर्वांत मोठा एसएमई आयपीओ आहे, तर फोनबॉक्स कंपनी आयपीओतून २०.३७ कोटी रुपये उभारणार आहे.

Nova Agritech Brisk Technovision Delaplex Phonebox Harshdeep Hortico And Megatherm Induction Ipo To Open This Week
Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्समध्ये असेल तेजी; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

बोलीसाठीही वाढीव संधी

नोव्हा अॅग्रीटेकचा आयपीओ आधी २२ ते २४ जानेवारी दरम्यान खुला होणार होता. त्याच्यासाठी आता २३ ते २५ जानेवारी दरम्यान बोली लावता येणार आहे. त्याच्या शेअरची नोंदणी ३१ जानेवारी रोजी होणार आहे.

एसएमई  विभागातील क्वालिटेक लॅब्सच्या आयपीओसाठीही बोली लावण्याची मुदत २३ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. ब्रिस्क टेक्नोव्हिजनचा आयपीओ पूर्वनियोजित २२ जानेवारीऐवजी मंगळवारी (ता.२३) उघडेल आणि २५ जानेवारीला बंद होईल. त्याची नोंदणीही ३० जानेवारी ऐवजी ३१  जानेवारी रोजी होईल.

नोंदणीसाठी मुदतवाढ

अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे सोमवारी (ता.२२)  मुंबई शेअर बाजार (बीएसई) व राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई)  या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांना सुट्टी देण्यात आल्याने सर्व आयपीओंचे काम एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.

Nova Agritech Brisk Technovision Delaplex Phonebox Harshdeep Hortico And Megatherm Induction Ipo To Open This Week
Megatherm Induction IPO: 25 जानेवारीला खुला होणार मेगाथर्म इंडक्शनचा आयपीओ; काय आहे प्राइस बँड?

त्यामुळे ‘बीएसई’ आणि ‘एनएसई’वर नोंदणी होणाऱ्या मेडी असिस्ट हेल्थकेअरच्या आयपीओची आणि ‘एनएसई एसएमई’ मंचावर नोंदणी होणाऱ्या ‘मॅक्सस्पोजर’ आयपीओची नोंदणीही मंगळवारी (ता.२३) होणार आहे. ‘इपॅक ड्युरेबल्स’च्या आयपीओ आता २३ जानेवारीऐवजी २४ जानेवारी रोजी बंद होईल. त्यामुळे त्याची नोंदणीही ३० जानेवारीला होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com