
Ola Electric Shares Fall: OLAचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या वर्षी, प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरमधील समस्यांमुळे X या सोशल मीडियावर त्याने पोस्ट केली होती, त्यानंतर ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स वेगाने घसरले होते.
यानंतर भाविश अग्रवाल यांनी घोषणा केली होती की, ओला इलेक्ट्रिकची लवकरच देशात 5,000 सर्व्हिस स्टेशन्स असतील. त्यानंतरच ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये सुरू असलेली घसरण थांबली.