
Stock Market Closing Today: गुरुवारी (8 मे) भारतीय शेअर बाजारांनी सकारात्मक ट्रेंडसह सुरुवात केली परंतु नंतर बाजार घसरला. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. बाजारात प्रॉफिट बुकिंग आणि एक्सपायरी सेटलमेंटमुळे सेन्सेक्स 411 अंकांनी घसरून 80,334 वर बंद झाला. निफ्टी 140 अंकांनी घसरून 24,300 वर बंद झाला. बँक निफ्टी 245 अंकांनी घसरून 54,365 वर बंद झाला.