Paytm Share Price: पेटीएम कंपनी अडचणीत असताना शेअर्समध्ये का होतेय वाढ? काय आहे कारण

Paytm Share Price: पेटीएमच्या शेअर्सने सलग दुसऱ्या दिवशी अप्पर सर्किटला धडक दिली. आज पुन्हा पेटीएममध्ये 5 टक्के वाढ दिसून आली आहे. सुरुवातीच्या व्यापारात, पेटीएमचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर पोहोचले आणि 389.20 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
Paytm Share Price: पेटीएम कंपनी अडचणीत असताना शेअर्समध्ये का होतेय वाढ? काय आहे कारण

Paytm Share Price: पेटीएमच्या शेअर्सने सलग दुसऱ्या दिवशी अप्पर सर्किटला धडक दिली. आज पुन्हा पेटीएमच्या शेअर्समध्ये 5 टक्के वाढ दिसून आली आहे. सुरुवातीच्या व्यापारात, पेटीएमचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर पोहोचले आणि 389.20 रुपयांवर व्यवहार करत आहेत.

येस सिक्युरिटीजकडून स्टॉकचे रेटिंग अपग्रेड केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. ब्रोकरेज फर्मने पेटीएम स्टॉकला 'न्यूट्रल' वरून 'बाय' रेटिंगवर अपग्रेड केले आहे आणि आधीच्या 350 वरून लक्ष्य किंमत 505 रुपये प्रति शेअर वाढवली आहे.

मॉर्गनने 555 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह 'Equal weight' रेटिंग दिले आहे. हा शेअर 998 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून सुमारे 63 टक्क्यांनी घसरला आहे.

ब्रोकरेज हाऊसने रेटिंग अपग्रेडमागील कारणे सांगितली आहेत, ज्यात महसुलासाठी पेटीएमचे वॉलेट व्यवसायावरील अवलंबित्व कमी झाले आहे. मल्टी-बँक मॉडेलमध्ये थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर (TPAP) म्हणून UPI ​​मध्ये सहभागी होण्यासाठी कंपनीला NPCI ची मान्यता मिळाली आहे.

RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातली होती

पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने 29 फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहक खाते, वॉलेट, फास्टॅग आणि इतर साधनांमध्ये ठेवी स्वीकारण्यास किंवा टॉप-अप करण्यास बंदी घातली होती.

Paytm Share Price: पेटीएम कंपनी अडचणीत असताना शेअर्समध्ये का होतेय वाढ? काय आहे कारण
मुदत ठेव, किंवा शेअरमध्ये गुंतवणूक?

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईचा आढावा घेण्याची शक्यता कमी आहे. सर्वसमावेशक मूल्यांकनानंतरच आरबीआय संस्थांविरुद्ध कारवाई करते, असेही ते म्हणाले.

आरबीआयचा फिनटेक क्षेत्राला पाठींबा आहे यावर जोर देऊन, दास म्हणाले की आम्ही ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तसेच आर्थिक स्थिरतेसाठी काम करत आहेत.

म्युच्युअल फंडांनी कंपनीतील हिस्सा विकला

6 म्युच्युअल फंडांनी त्यांचा संपूर्ण हिस्सा विकून फेब्रुवारीमध्ये पेटीएमची कंपनी One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडमधून बाहेर पडले आहेत. 6 म्युच्युअल फंड होते ज्यांनी त्यांचा हिस्सा कमी केला आहे.

Paytm Share Price: पेटीएम कंपनी अडचणीत असताना शेअर्समध्ये का होतेय वाढ? काय आहे कारण
Supreme Court: 'SBIने इलेक्टोरल बाँडची पूर्ण माहिती द्यावी' सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला दिले आदेश

एकूणच, म्युच्युअल फंडांनी 380 कोटी रुपयांचे 91 लाख शेअर्स विकले. पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने लादलेल्या निर्बंधांनंतर, पेटीएमच्या स्टॉकमध्ये मोठी घसरण झाली आणि अनेक भागधारकांनी भागभांडवल विकले.

सध्या 18 म्युच्युअल फंडांमध्ये पेटीएमचे 1426 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. जानेवारीमध्ये 24 म्युच्युअल फंडांकडे 3,384 कोटी रुपयांचे शेअर्स होते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com