Market Cap: पीएनबीने केली कमाल! बँकेचे मार्केट कॅप 1 लाख कोटींच्या वर, अशी कामगिरी करणारी तिसरी बँक

Punjab National Bank: सध्या बँकेचा शेअर 55 महिन्यांच्या उच्चांकावर आहे.
PNB becomes the third public sector bank to have one lakh crore market cap
PNB becomes the third public sector bank to have one lakh crore market cap Sakal

Punjab National Bank: सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेचे मार्केट कॅप 1 लाख कोटीच्या पुढे गेले आहे. ही तिसरी सरकारी बँक ठरली जिचे मार्केट कॅप 1 लाख कोटीच्या पुढे गेले आहे.

फेडरल रिझर्व्ह बँकेने 2024 मध्ये व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत, त्यानंतर बँकिंग स्टॉकमध्ये वाढ दिसून येत आहे. सध्या हा शेअर 92 रुपयांवर ट्रेड करत असून 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. सध्या हा शेअर 55 महिन्यांच्या उच्चांकावर आहे. त्यांची मार्केट कॅप 100465 कोटी आहे.

पीएसयू बँक स्टॉक्समध्ये गेल्या 11 ट्रेडिंग सत्रांमध्ये सतत वाढ होत आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या इंडेक्सने मल्टी इयर ब्रेकआउट दिला आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात सरकारी बँकांचे शेअर्स खासगी बँकांच्या तुलनेत जास्त कामगिरी करतील. निफ्टी पीएसयू बँक इंडेक्स सोमवारी 2.4 टक्क्यांनी वाढला. या वर्षी आतापर्यंत हा इंडेक्स सुमारे 34% वाढला आहे.

PNB becomes the third public sector bank to have one lakh crore market cap
Multibagger Stock: अवघ्या 15 वर्षात एका लाखाचे झाले एक कोटी, 10 महिन्यात 192 टक्के परतावा

गेल्या 3 ट्रेडिंग सत्रांपासून पीएनबी शेअरमध्ये सतत वाढ होत आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात हा शेअर 91 रुपयांवर उघडला आणि 92 रुपयांचा उच्चांक बनवला. या शेअरने एका महिन्यात 15.5 टक्के, तीन महिन्यांत 23 टक्के, सहा महिन्यांत 75 टक्के आणि यावर्षी आतापर्यंत 60 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

PNB becomes the third public sector bank to have one lakh crore market cap
IPO Week: या आठवड्यात शेअर बाजारात होणार धमाका! 12 कंपन्यांचे येणार IPO अन् 8 कंपन्या होणार लिस्ट

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com