
Burgundy Private Hurun India 500: भारतातील सर्वात शक्तिशाली कंपन्यांची (Burgundy Private Hurun India 500) यादी जाहीर झाली असून, पुन्हा एकदा रिलायन्स इंडस्ट्रीजने बाजी मारली आहे. ही कंपनी केवळ सर्वाधिक कमाई करणारीच नाही तर सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी बनली आहे.
रिलायन्सने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 9.3 लाख कोटींचा महसूल मिळवला, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 3% अधिक आहे. त्याच वेळी, कंपनीचा निव्वळ नफा 79,020 कोटींवर पोहोचला आहे.