
ईडीने (ED) अनिल अंबानी ग्रुपशी संबंधित 35 ठिकाणांवर, 50 कंपन्यांवर आणि 25 हून अधिक व्यक्तींवर मनी लॉन्ड्रिंग तपासात धाड टाकली.
2017 ते 2019 दरम्यान येस बँकेने RAAGA कंपन्यांना दिलेल्या 3,000 कोटींच्या कर्जातील गैरव्यवहार, लाचलुचपत आणि फसवणुकीचा तपास सुरु आहे.
रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स 5% कोसळले.
Reliance Shares Hit Lower Circuit: मुंबई आणि नवी दिल्लीतील जवळपास 35हून अधिक ठिकाणी प्रवर्तन संचालनालयाने (ED) छापे टाकले. ही कारवाई रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात करण्यात आली आहे.