एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस

स्टेट बँक ऑफ इंडियाची उपकंपनी असलेली एसबीआय कार्ड्‌स आणि पेमेंट सर्व्हिसेस लि. ही कंपनी भारतातील दुसरी सर्वांत मोठी क्रेडिट कार्ड वितरणकर्ता म्हणून कार्यरत आहे. कंपनीने व्यवसायवृद्धीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक केली आहे.
sbi cards and payment services invest in modern technology
sbi cards and payment services invest in modern technologysakal

स्टेट बँक ऑफ इंडियाची उपकंपनी असलेली एसबीआय कार्ड्‌स आणि पेमेंट सर्व्हिसेस लि. ही कंपनी भारतातील दुसरी सर्वांत मोठी क्रेडिट कार्ड वितरणकर्ता म्हणून कार्यरत आहे. कंपनीने व्यवसायवृद्धीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक केली आहे.

कंपनीने कार्डधारकांच्या वर्तनावर; तसेच व्यवहाराच्या नमुन्यांवर आधारित भविष्यसूचक मॉडेलिंग विश्लेषणे वापरली आहेत. यामुळे प्रत्येक ग्राहकाला लक्ष्यित उत्पादने; तसेच सेवा देण्यास कंपनी प्रयत्नशील आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि प्रक्रिया ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा नियमित क्रियाकलपांसाठी वापर करत कंपनी कार्यक्षमतेत वाढ करत आहे. स्टेट बँकेकडून या कंपनीला मजबूत आर्थिक; तसेच व्यवस्थापकीय आणि ब्रँडिंग समर्थन प्राप्त होते.

‘रिलायन्स रिटेल’सोबत भागीदारी

गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या सप्टेंबर-डिसेंबर २०२३ या कालावधीतील तिमाही निकालानुसार, कंपनीचा महसूल रु. ४६२१ कोटी आहे; तसेच कंपनीचा निव्वळ नफा रु. ५४९ कोटी रुपयांवर पोहचला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या महसुलात सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर निव्वळ नफ्यात सुमारे ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या तीन तिमाही निकालांनुसार, कंपनीचा एकूण निव्वळ नफा १७४५ कोटी रुपयांवर पोहचला आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत निव्वळ नॉन-परफॉर्मिंग ॲसेटचे (एनपीए) प्रमाण केवळ ०.९६ टक्के होते.

कार्डधारकांनी खर्च केलेल्या एकूण रकमेत सुमारे ४१ टक्के वाढ झाली आहे; तसेच कार्ड-इन-फोर्स, कंपनीने वितरित केलेल्या सर्व क्रेडिट कार्डांची बेरीज, मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १६ टक्क्यांनी वाढली आहे.

३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कंपनीचा एकूण ताळेबंद आकार रू. ५५७६ कोटी झाला आहे. तिमाही निकालाबरोबर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायवृद्धीसाठी कंपनीने ‘रिलायन्स एसबीआय कार्ड’ सादर करत ‘रिलायन्स रिटेल’सोबत भागीदारी केली आहे.

व्यवसायवृद्धीची शक्यता व क्षमता

इक्विटीवर सातत्याने २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत कंपनी कार्यक्षमतेने व्यवसायात प्रगती करत आहे. ‘यूपीआय’शी क्रेडिट कार्ड लिंक करणे, हा भारतातील क्रेडिट कार्ड कंपन्यांसाठी आगामी काळात व्यवसायवृद्धीचा घटक ठरू शकतो.

क्रेडिट कार्ड हा बँकेच्या उत्पादन ऑफरचा अविभाज्य भाग आहे. यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया या पालक कंपनीसाठीदेखील एसबीआय कार्ड्‌स अँड पेमेंट सर्व्हिसेस या कंपनीचा व्यवसाय धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.

वाढता ग्राहकवर्ग आणि विविध प्रकारच्या सुलभ ‘ईएमआय’च्या स्वरूपात परतफेडीचा पर्याय आदी अनेक ग्राहककेंद्रित बाबींचा विचार करता, दीर्घावधीमध्ये भारतात या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वृद्धी होऊ शकते. दीर्घावधीतील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता, या कंपनीच्या शेअरमध्ये जोखीम लक्षात घेऊन मर्यादित प्रमाणात गुंतवणूक करण्याचा विचार करायला हरकत नाही.

(डिस्क्लेमर : या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com