
Sebi Bans Ketan Parekh: सेबीने गुरुवारी केतन पारेख याच्यासह तीन जणांना रोखे बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली. या लोकांवर 'फ्रंट-रनिंग'मध्ये सहभागी होऊन 65.77 कोटी रुपयांचा अवैध नफा कमावल्याचा आरोप आहे. केतन पारेख परदेशी ग्राहकांच्या डीलवर फ्रंट रनिंग करायचा. हे फ्रंट रनिंग सिंगापूरमध्ये व्हायचे.