
सेबीने ट्रेडिंग गुरु अवधूत साठे यांच्या करजतमधील अकादमीवर धाड टाकून डिजिटल डेटा जप्त केला.
साठेंवर रिटेल इन्व्हेस्टर्सची फसवणूक करणे आणि गॅरंटीड रिटर्नचे आश्वासन देण्याचा आरोप आहे.
या कारवाईनंतर इतर मार्केट इन्फ्लुएंसर्समध्येही खळबळ उडाली आहे.
Sebi Raid on Avadhut Sathe: मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाच्या दरम्यान 20 ऑगस्टला सकाळी 6.30 वाजता सेबीच्या पथकाने मोठी कारवाई केली. या वेळी सेबीच्या निशाण्यावर होते प्रसिद्ध ट्रेडिंग गुरु आणि मार्केट इन्फ्लुएंसर अवधूत साठे. सह्याद्री हिल्सवरील करजतमधील त्यांच्या अकादमीवर सेबीच्या डिप्टी जनरल मॅनेजर यांच्या नेतृत्वाखालील टीमने छापा टाकला.