
बाजाराची सकारात्मक सुरुवात: बुधवारी सेन्सेक्स 265 अंकांनी आणि निफ्टी 79 अंकांनी वाढीसह उघडले. आयटी, ऑटो आणि फार्मा क्षेत्रात खरेदी झाली, तर रिअल्टी निर्देशांकात 1.5% घसरण झाली.
टॉप गेनर्स आणि लूजर्स: टाटा मोटर्स, मारुती, जिओ फायनान्शियल्स, अदानी एंटरप्रायझेस, इटरनल आणि बजाज ऑटो निफ्टीवर टॉप गेनर्स ठरले. टायटन, टाटा कंझ्युमर, एसबीआय, एचयूएल आणि बीईएल मध्ये घसरण झाली.
जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत: GIFT निफ्टी 70 अंकांनी वाढला, निक्केई ट्रेड डीलनंतर 950 अंकांनी वाढला.
Stock Market Opening Today: बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स 265 अंकांनी वाढत 82,451 वर उघडला, तर एनएसई निफ्टी 79 अंकांनी वधारून 25,139 वर सुरु झाला. बँक निफ्टी देखील 162 अंकांच्या वाढीसह 56,918 वर पोहोचला. मात्र, चलन बाजारात रुपया 4 पैशांनी घसरला आणि 86.41 वर सुरु झाला. रियल्टी इंडेक्समध्ये सुमारे दीड टक्क्यांची घसरण झाली, तर ऑटो, आयटी, मीडिया आणि फार्मा क्षेत्रांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली.