
सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही घसरले: दिवसअखेर सेन्सेक्स 13 अंकांनी घसरून 82,186.81 वर आणि निफ्टी 29 अंकांनी घसरून 25,060 वर बंद झाले.
इटरनलचा शेअर चमकला: झोमॅटोची मूळ कंपनी इटरनलचे शेअर्स तिमाही निकालांनंतर 10% वाढले, महसूल 70% वाढून 7,167 कोटींवर पोहोचला.
बाजारात जोरदार हालचाल: बीएसईवरील 4,198 शेअर्सपैकी 1,783 वाढले, 2,236 घसरले, 253 शेअर्स अप्पर सर्किटवर तर 209 लोअर सर्किटवर बंद झाले.
Stock Market Closing Today: आज मंगळवार, 22 जुलै रोजी भारतीय शेअर बाजारात दिवसभर चढ-उतार झाल्यानंतर शेवटी बाजार लाल रंगात बंद झाले. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स 300 अंकांनी वाढत 82,527.43 वर पोहोचला होता. दिवसभरात हा निर्देशांक 82,538.17 च्या उच्चांकावर आणि 82,110 च्या नीचांकावर गेला. शेवटी तो फक्त 13 अंकांनी घसरून 82,186.81 वर बंद झाला.