
निफ्टी 25,000च्या खाली आणि सेंसेक्स 350 अंकांनी घसरला; NBFC, ऑटो, मेटल आणि FMCG शेअर्सवर दबाव.
FIIs ने चौथ्या दिवशी 3080 कोटींची विक्री, तर DIIs ने सलग 14 व्या दिवशी 2,600 कोटींची खरेदी केली.
सोने-चांदीच्या किमतीत घसरण; कच्चं तेल 69डॉलरच्या वर आहे.
Stock Market Opening Today: आज शुक्रवारी (25 जुलै) देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सेन्सेक्स 350 अंकांनी घसरला. निफ्टी 100 अंकांनी घसरून 25,000 च्या खाली आला. बँक निफ्टी देखील 125 अंकांनी घसरला आहे. सुरुवातीच्या काळात सेन्सेक्स 119 अंकांनी घसरून 82,065 वर उघडला. निफ्टी 52 अंकांनी घसरून 25,010 वर उघडला.