Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्समध्ये 300 अंकांची उसळी, कोणत्या शेअर्समध्ये खरेदी?

Share Market Opening: गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. चांगल्या जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स जवळपास 300 अंकांनी वाढून 71,900 वर पोहोचला आहे. निफ्टीनेही 80 अंकांची उसळी घेतली आणि तो 21,700 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
Sensex trades over 250 pts higher Nifty above 21,700 oil and gas stocks gain
Sensex trades over 250 pts higher Nifty above 21,700 oil and gas stocks gain Sakal

Share Market Opening Latest Update 11 January 2024: गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. चांगल्या जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स जवळपास 300 अंकांनी वाढून 71,900 वर पोहोचला आहे. निफ्टीनेही 80 अंकांची उसळी घेतली आणि तो 21,700 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. बँकिंग, ऑटो, मेटल क्षेत्रात वाढ होत आहे. हिरो मोटो कॉर्प निफ्टीमध्ये 2% वाढीसह व्यवहार करत आहे.

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 24 शेअर्समध्ये वाढ आणि केवळ 6 शेअर्समध्ये घसरण होत आहे. सेन्सेक्सच्या सर्वाधिक वाढणाऱ्या शेअर्समध्ये, अॅक्सिस बँक 1.50 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. बजाज फिनसर्व्ह 1.20 टक्क्यांनी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज 0.97 टक्क्यांच्या वाढीसह टॉप गेनर्समध्ये आहे.

जागतिक शेअर बाजारातील चढ-उताराच्या काळात भारतीय शेअर बाजारातील वाढ ही खूप सकारात्मक आहे. गुरुवारच्या व्यवहारात आयटी शेअर्सवर व्यापारी लक्ष ठेवतील, असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Sensex trades over 250 pts higher Nifty above 21,700 oil and gas stocks gain
Adani Group: अदानी समूहाची आणखी एक कंपनी शेअर बाजारात होणार लिस्ट; काय आहे प्लॅन?

TCS आणि Infosys सारख्या कंपन्या तिसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत. कंपन्यांचे तिमाही निकाल येत असल्यामुळे गुरुवारी शेअर बाजारात किंचित वाढ दिसून येऊ शकते.

बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. अदानी एंटरप्रायझेसने सर्वात कमी 0.2 टक्के वाढ झाली तर अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 1.58 टक्क्यांची वाढ झाली.

Sensex trades over 250 pts higher Nifty above 21,700 oil and gas stocks gain
Budget 2024: मोदी सरकार 8वा वेतन आयोग लवकरच आणणार? अर्थसंकल्पात घोषणा करण्याची शक्यता

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या कंपन्यांमध्ये ओम इन्फ्रा, पटेल इंजिनिअरिंग, एचडीएफसी लाईफ, महिंद्रा अँड महिंद्रा, जिओ फायनान्शियल, कामधेनू लिमिटेड, युनिपार्ट्स इंडिया, कोटक महिंद्रा बँक, एक्साइड इंडस्ट्रीज, ग्लोबस स्पिरिट, देवयानी इंटरनॅशनल, टाटा मोटर्स, स्टोव्ह क्राफ्ट, नेस्ले इंडिया, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स वधारले तर ब्रँड कॉन्सेप्टचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com