Share Market Closing: अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्समध्ये 544 अंकांनी वाढ, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Closing: बुधवारी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. घसरणीसह सुरुवात झाल्यानंतर बाजारात जबरदस्त खरेदी झाली. प्रमुख निर्देशांक तेजीसह व्यवहार करत होते. सेन्सेक्स 400 अंकांच्या वाढीसह 71,550 च्या पुढे व्यवहार करत होते.
Sensex up 544 points, Nifty at 21,700 ahead of budget; Sun Pharma rallies
Sensex up 544 points, Nifty at 21,700 ahead of budget; Sun Pharma ralliesSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 31 January 2024: बुधवारी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. घसरणीसह सुरुवात झाल्यानंतर बाजारात जबरदस्त खरेदी झाली. प्रमुख निर्देशांक तेजीसह व्यवहार करत होते. सेन्सेक्स 400 अंकांच्या वाढीसह 71,550 च्या पुढे व्यवहार करत होते.

निफ्टीनेही 110 अंकांची उसळी घेतली असून तो 21,600 च्या जवळ बंद झाला. बाजारात सर्वाधिक खरेदी बँकिंग, वाहन आणि फार्मा क्षेत्रात झाली. निफ्टीमध्ये डॉ. रेड्डीज आणि टाटा मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक वाढले.

Share Market Closing
Share Market ClosingSakal

कोणते शेअर्स घसरले?

बुधवारी शेअर बाजारात डॉ. रेड्डीज लॅब्सच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली, तर आयशर मोटर, सन फार्मा आणि टाटा मोटर्सचे शेअर्सही वाढीसह बंद झाले. लार्सन अँड टुब्रो, टायटन, बीपीसीएल आणि टाटा कंझ्युमर या कंपन्यांचे शेअर्स बाजारात सर्वाधिक घसरले.

Sensex up 544 points, Nifty at 21,700 ahead of budget; Sun Pharma rallies
Tata Motors: टाटा मोटर्सचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर; सलग पाचव्या दिवशी जोरदार खरेदी, काय आहे कारण?

देशातील सर्वात मोठी प्रवासी वाहन कंपनी मारुती सुझुकीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मारुती सुझुकी कंपनीचा एकत्रित नफा 33 टक्क्यांनी वाढून 3260 कोटी रुपये झाला आहे, तर महसूल 15 टक्क्यांनी वाढून 33,512 कोटी रुपये झाला आहे.

कोणते शेअर्स वाढले?
कोणते शेअर्स वाढले?Sakal

कोणते शेअर्स वाढले?

शेअर बाजारात वाढ झालेल्या शेअर्समध्ये डॉ. रेड्डीज लॅब्स, आयशर मोटर्स, डिव्हीज लॅब, सन फार्मा, टाटा मोटर्स, सिप्ला आणि एसबीआय यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर लार्सन अँड टुब्रो, टायटन, बीपीसीएल, टाटा कंझ्युमर आणि कोटक बँक यांचे शेअर्स वधारले.

Sensex up 544 points, Nifty at 21,700 ahead of budget; Sun Pharma rallies
Budget 2024: गरिबी हटाव ते राम मंदिर, राष्ट्रपतींच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.19 लाख कोटी रुपयांची वाढ

शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत कमालीची वाढ झाली आहे. बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप 379.57 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर बंद झाले. गेल्या ट्रेडिंग सत्रात मार्केट कॅप 375.38 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.19 लाख कोटी रुपयांची उडी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com