
Stock Market and Investment Tips: शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार अडचणीत आले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून बाजारात घसरण सुरू आहे. यामुळे अनेक म्युच्युअल फंड देखील चांगला परतावा देत नाहीत. तर बरेच गुंतवणूकदार अजूनही जास्त परताव्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करत आहेत. अशा परिस्थितीत एका व्यक्तीने आपल्या कुटुंबाला शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.