Share Market Closing : शेअर बाजारात मोठी घसरण; 'या' शेअर्सला मोठा दणका

BSE सेन्सेक्स पुन्हा 60,000 च्या खाली आला आहे.
Share Market
Share Market Sakal

Stock Market Closing On 9th March 2023 : गुरुवारचे सत्र भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत निराशाजनक ठरले. आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री आणि नफा बुकिंग पाहिली.

BSE सेन्सेक्स पुन्हा 60,000 च्या खाली आला आहे. आजच्या व्यवहाराअंती सेन्सेक्स 588 अंकांनी घसरून 59,760 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 171 अंकांनी घसरून 17,583 अंकांवर बंद झाला.

आजच्या व्यवहारात सर्वच क्षेत्रातील शेअर्स घसरून बंद झाले आहेत. बँकिंग, ऑटो, आयटी, मेटल्स, एनर्जी एफएमसीजी, फार्मा, हेल्थकेअर. रिअल इस्टेट, मीडिया. तेल आणि वायूशिवाय ग्राहक टिकाऊ वस्तू क्षेत्राचे शेअर्स घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही नफा बुकिंग झाली.

BSE India
BSE IndiaSakal

आजच्या व्यवहारात ऑटो, रियल्टी, आयटी शेअर्स घसरले तर एनर्जी, एफएमसीजी, बँकिंग शेअर्सवर दबाव होता. दुसरीकडे, मेटल निर्देशांक काठावर बंद झाला.

लघु-मध्यम शेअर्समध्ये आज दबाव दिसून आला. बीएसईच्या मिडकॅप निर्देशांकात 0.6 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांकात 0.2 टक्क्यांची घसरण दिसून आली.

Share Market
Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याबाबत फडणवीसांची घोषणा; आता...

अदानी एंटरप्रायझेस, एम अँड एम, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदानी पोर्ट्स हे निफ्टीचे सर्वाधिक नुकसान करणारे आहेत.

तर टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, अपोलो हॉस्पिटल्स आणि अॅक्सिस बँक निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आहेत.

एफएमसीजी, रियल्टी, ऑटो आणि आयटी निर्देशांक आजच्या व्यवहारात 1 टक्क्यांनी घसरले. दुसरीकडे, धातू आणि ऊर्जा निर्देशांक आज तेजीसह बंद झाले.

Share Market
डेट फंडातही आकर्षक परताव्याची संधी..पण गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा...

'या' शेअर्समध्ये तेजी :

टाटा स्टील 1.60 टक्के, लार्सन 1.03 टक्के, अपोलो हॉस्पिटल्स 0.96 टक्के, भारती एअरटेल 0.89 टक्के, अॅक्सिस बँक 0.80 टक्के, JSW स्टील 0.71 टक्के, सिप्ला 0.51 टक्के हे शेअर्स तेजीसह बंद झाले.

'या' शेअर्समध्ये घसरण :

घसरलेल्या शेअर्सवर नजर टाकल्यास, अदानी एंटरप्रायझेस 4.24 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 3.24 टक्क्यांनी, एसबीआय लाइफ इन्शुरन्स 2.88 टक्के, रिलायन्स 2.40 टक्के, अदानी पोर्ट्स 2.08 टक्के, बजाज फिनसर्व्ह 2,05 टक्क्यांनी घसरले. आयशर मोटर्स 1.80 टक्क्यांनी घसरण झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com