Share Market Closing: शेवटच्या काही तासांतल्या खरेदीमुळे शेअर बाजारात हलकी तेजी, आयटी स्टॉक्समध्ये l share market closing latest updats today 6 june 2023 bse nse sensex nifty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Closing

Share Market Closing: शेवटच्या काही तासांतल्या खरेदीमुळे शेअर बाजारात हलकी तेजी, आयटी स्टॉक्समध्ये...

Share Market Closing 6 June 2023 : व्यावसायिक सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी कामकाजी दिवसाच्या शेवच्या काही तासांत गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे भारतीय शेअर बाजार हिरवा कंदील दाखवत बंद झाला. पण ही फारच थोड्याप्रमाणातली तेजी होती. अन्यथा दिवस तसा सपाट गेला.

पण बाजा बंद होताना सेंसेक्स 5 अंकांनी हलकासा वर गेला. 18,599 अंकांवर बंद झाला.

दिवसाच्या सुरुवातीला सेंसेक्स 233 आणि निफ्टी 62 अंकांच्या घसरणीत कामकाज सुरू होतं. पण बाजा बंद होताना सेंसेक्स हलकासा वर गेला. या आधी आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण बघायला मिळाल्याने संपूर्ण दिवस घसरणीतच कामकाज सुरू होते.

IT स्टॉक्स ने वाढवला दबाव

निफ्टीमध्ये टेक महिंद्रा आणि इंफोसिसचे शेअर्स 1-1 टक्क्यांनी घसरले. तर अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर 3 टक्क्यांनी वाढून बंद झाला, हाच निर्देशांकात सर्वाधिक वाढला आहे. या आधी सोमवारी (काल) भारतीय शेअर बाजार 240 अंकांनी वाढून 62,787 वर बंद झाला होता.

निफ्टी शेअर्समध्ये -

तेजीत असणारे शेअर्स

शेअर                तेजी
Ultratech     +3%
Divi's Lab    +2.20%
Kotak Bank +2%
Axis Bank    +2%

घसरण होणारे शेअर्स 

शेअर              घसरण
Tech Mah     -2.1%
Infosys         -1.95%
TCS             -1.70%
ONGC          -1.06%

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती:

आज बँकींग, ऑटो, फार्मा, रियल इस्टेट, इंफ्रा, हेल्थकेअर आणि ऑईल अँड गॅस क्षेत्रांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. तर आयटी, सराकारी बँका, एफएमसीजी मेटल्स, मीडिया आणि ऊर्जा कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रांच्या शेअर्समध्ये घसरण होती. मीड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्स पण तेजीसह बंद झाला. निफ्टीचे 50 शेअर्स मध्ये 28 शेअर्स तेजीत तर 22 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर सेंसेक्स चे 30 शेअर्स मध्ये 17 शेअर्स तेजीसह तर 13 घसरणीत बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ:

आयटी स्टॉकमध्ये घसरण असूनही गुंतवणुकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. आज बाजार बंद होताना BSE मध्ये लिस्टेड कंपनींचे मार्केट कॅप वाढून 286.62 लाख कोटी रुपये झाले. जे मागच्या ट्रेडिंग सत्रात 286.06 लाख कोटी रुपये होते. म्हणजे आजच्या दिवसात गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 56000 कोटींची वाढ झाली आहे.

टॅग्स :Share Market