

share market
Sakal
Share Market Closing : आज भारतीय शेअर बाजारात सुरुवातीपासूनच दबावाचे वातावरण दिसले. सकाळी स्थिर व्यवहाराने बाजार सुरु झाल्यानंतर BSE चा सेन्सेक्स दिवसाच्या अखेरीस 150.68 अंकांनी घसरून 84,628 अंकांवर तर निफ्टी 29.85 अंकांनी घसरून 25,936.20 अंकांवर थांबला.
शेअर बाजारात धातू क्षेत्रातील कंपन्यांनी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी चांगली कामगिरी केली, तर रिअल्टी, फार्मा, आयटी सारख्या क्षेत्रात घसरण झाली. सध्या सुरू असलेल्या तिमाही निकाल हंगामात गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन सावध असल्याने बाजारात व्यापक विक्रीचा कल दिसला.