Share Market : 'या' मल्टीबॅगर शेअरमध्ये करा गुंतवणूक, मिळेल जबरदस्त रिटर्न आणि जोखीमही कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : 'या' मल्टीबॅगर शेअरमध्ये करा गुंतवणूक, मिळेल जबरदस्त रिटर्न आणि जोखीमही कमी

Share Market Investment Tips : ऑटोमोबाईल कंपोनेंट्स बनवणारी कंपनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडच्या (Samvardhana Motherson) शेअर्समध्ये येत्या काळात दमदार तेजी दिसू शकते असा विश्वास शेअर मार्केट एक्सपर्ट व्यक्त करत आहे.

हे शेअर्स आतापेक्षा सुमारे 34 टक्क्यांनी वाढू शकतात. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने हा अंदाज व्यक्त केला आहे. कंपनी अधिग्रहणाद्वारे आपला व्यवसाय वाढवत आहे, ज्याचा परिणाम त्याच्या शेअर्सवर दिसून येत आहे.

संवर्धन मदरसनने अलीकडेच जर्मन ऑटोमोटिव्ह सप्लायर एसएएस ऑटो सिस्टम टेकनिक GmbH मधील संपूर्ण 100% स्टेक सुमारे 4,789 कोटीमध्ये खरेदी करण्यासाठी करार केला आहे.

एसएएस ही कारसाठी कॉकपिट मॉड्यूल असेंब्लीची जगातील आघाडीची कंपनी आहे. त्याचे जवळपासच्या देशांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्ससह ऑफिसेस आहेत आणि यात सुमारे 5,000 कर्मचारी काम करतात.

कंपनीची सर्वात मोठी ग्राहक एक आघाडीची जागतिक इलेक्ट्रिक वाहन कंपनी आहे. याशिवाय फोक्सवॅगन ग्रुप, डेमलर आणि स्टेलांटिस हे देखील त्याचे प्रमुख ग्राहक आहेत.

त्यामुळेच आयसीआयसीआय सिक्युरिटीजने संवर्धन मदरसनचे 'बाय' रेटिंग कायम ठेवत 110 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. ही टारगेट प्राईस सध्याच्या शेअरच्या किमतीपेक्षा सुमारे 34 टक्क्यांनी जास्त आहे.

संवर्धन मदरसन इंटरनॅशनलची मल्टीबॅगर शेअरमध्ये मोडतो, कारण त्यांनी अवघ्या काही हजार रुपयांच्या गुंतवणूकीवर आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. मंगळवारी एनएसईवर संवर्धन मदरसनचे शेअर्स 81.95 रुपयांवर बंद झाले.

पण 23 वर्षांपूर्वी, 1 जानेवारी 1999 रोजी त्याची किंमत फक्त 0.08 पैसे होती. म्हणजेच गेल्या 23 वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 102,337.50% चा बंपर परतावा दिला आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने 23 वर्षांपूर्वी संवर्धन मदरसनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक आजपर्यंत कायम ठेवली असती तर त्या 1 लाखाचे आज 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असते. किंवा अगदी एखाद्याने 10,000 हजार गुंतवले असते तर आज त्याचीही किंमत 1 कोटींहून अधिक झाली असती.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.