

IPO Buzz Before Budget 2026: 5 New SME IPOs to Open This Week
eSakal
प्रजासत्ताक दिनानंतर सुरू होणाऱ्या आठवड्यात शेअर बाजारातील वातावरण थोडं वेगळं असणार आहे. याच मुख्य कारण आहे येत्या रविवारी सादर होणारा अर्थसंकल्प. त्यामुळे शेअर बाजारातील हालचालींना आता वेग आला आहे. या आठवड्यात SME (लघु व मध्यम उद्योग) क्षेत्रातील 5 नवे IPO बाजारात येणार आहे. याशिवाय, आधीपासून सुरू असलेल्या 2 आयपीओ मध्ये गुंतवणुकीची संधी मिळणार आहे आणि काही कंपन्यांचे शेअर्सही बाजारात लिस्ट होणार आहेत.