Share Market : 'या' शेअर्समध्ये तब्बल 19% तेजी; एका महिन्यात गुंतवणूकदारांना केले मालामाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : 'या' शेअर्समध्ये तब्बल 19% तेजी; एका महिन्यात गुंतवणूकदारांना केले मालामाल

Mahindra CIE Automotive Ltd Share : महिंद्रा सीआयएच्या शेअर्समध्ये शुक्रवारी बीएसईवर 19 टक्क्यांची मजबूत इंट्राडे तेजी दिसून आली. सेशनच्या शेवटी महिंद्रा सीआयएचा शेअर 15.81 टक्‍क्‍यांनी वधारत 449 रुपयांवर बंद झाला.

स्टॉकचा हा नवा विक्रमी उच्चांक आहे. कंपनीने डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत 166.2 कोटी कंसोलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स नोंदवला आहे, जो वार्षिक आधारावर 96 टक्क्यांनी वाढला आहे.

निकालानंतर स्टॉकमध्ये तेजी सुरू आहे. त्याच वेळी, कंपनीचा एबिटा देखील वर्षभरात 62 टक्क्यांनी वाढून 290 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

महिंद्राच्या सीआयए स्टॉकमध्ये एका महिन्यात जवळपास 31 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, स्टॉक सहा महिन्यांत 68 टक्के आणि एका वर्षात 140 टक्क्यांनी वाढला आहे.

भारतात मिळालेल्या वाढ आणि मजबूत नफ्यामुळे त्यांच्या कामगिरीला चांगला सपोर्ट मिळाल्याचे कंपनीने म्हटले आहे. याव्यतिरिक्त, युरोपमधील मोठ्या प्रमाणावर प्रयत्नांमुळे खर्च (महागाई, एनर्जी, ट्रान्सपोर्ट) वाढण्यास मदत झाली आहे.

भारतातील बिझनेस ऑपरेशन मजबूत राहण्याची अपेक्षा असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. मात्र, दुचाकींची मागणी मंदावली आहे. शिवाय, कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने एबिटदा मार्जिनवर नकारात्मक परिणाम झाला.

देशांतर्गत मागणीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत व्यवसायाची कामगिरी युरोपियन व्यवसायापेक्षा चांगली झाल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणाले.

तर, युरोपीयन व्यवसायाने किमतीत वाढ होऊन चिपच्या तुटवड्यातून सुटका केल्याने सुधारणा होण्याची चिन्हे दिसून आली आहेत. याशिवाय वस्तूंच्या किमतीतही घट झाली आहे. अशा स्थितीत ब्रोकरेज कंपनीला दोन्ही क्षेत्रात मार्जिन सुधारण्याची आशा आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.