Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी इन्फोसिस, भारत फोर्जसह कोणते शेअर्स मिळवून देतील नफा?

शुक्रवारी बाजाराने पुन्हा नवा उच्चांक गाठला.
Share Market Today
Share Market TodayEsakal

Share Market Investment Tips: शुक्रवारी बाजाराने पुन्हा नवा उच्चांक गाठला. बाजाराला ऑटो आणि आयटी शेअर्सची सर्वाधिक साथ मिळाली. सर्व सेक्टरल इंडेक्स हिरव्या चिन्हात बंद झाले.

व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 803.14 अंकांनी अर्थात 1.26 टक्क्यांनी वाढून 64718.56 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 216.90 अंकांनी म्हणजेच 1.14 टक्क्यांनी वाढून 19189 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

भारत सर्व वाढीच्या मापदंडांमध्ये सामर्थ्य दाखवत आहे आणि पुढे जाऊन चांगले काम करण्यास तयार असल्याचे चित्र स्पष्ट होत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले.

चीनसह बहुतेक जागतिक अर्थव्यवस्था घसरत आहेत. अशा वातावरणात भारताला आशेचा किरण दिसत आहे.

तांत्रिकदृष्ट्या, डेली चार्टवर ब्रेकआउट कंटिन्युएशन फॉर्मेशन आणि विकली चार्टवर एक लाँग बुलिश कँडल पुढील तेजीचे संकेत देत आहे. बुल्ससाठी 19050 आणि 19000 वर सपोर्ट असेल.

वरच्या बाजूने असताना, 19300-19400 वर रझिस्टंस असेल. पण, 19000 च्या खाली घसरल्यास आणखी कमजोरी वाढू शकते. दुसरीकडे, जोपर्यंत बँक निफ्टी 44300 च्या वर राहील, तोपर्यंत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ही तेजी 45000-45300 पर्यंत जाऊ शकते.

Share Market Today
Higher Pension Option : वाढीव निवृत्तीवेतन नवा पर्याय! फायदेशीर की तोट्याचा? समजून घ्या गणित

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • इन्फोसिस (INFY)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • सनफार्मा (SUNPHARMA)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • एमफॅसिस (MPHASIS)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Share Market Today
Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com