Share Market Today: सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज कोणते शेअर्स मिळवून देतील मोठा नफा? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

Share Market Tips: युरोपीय बाजारातील कमकुवत संकेतांमुळे भारतीय बाजारावर दबाव आहे.
Share Market Today
Share Market TodaySakal

Share Market Investment Tips: शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. निफ्टी तर 19650 च्या खाली घसरला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 106.62 अंकांनी अर्थात 0.16 टक्क्यांनी घसरून 66160.20 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 13.90 अंकांच्या म्हणजेच 0.07 टक्क्यांच्या घसरणीसह 19646 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

युरोपीय बाजारातील कमकुवत संकेतांमुळे भारतीय बाजारावर दबाव राहिल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये प्रॉफिट बुकींग झाल्याने इंडेक्सवर दबाव आला.

पण, रियल्टी शेअर्समध्ये जोरदार खरेदीमुळे बाजारातील तोटा कमी करण्यास मदत झाली. आता सर्वांच्या नजरा आरबीआयच्या पतधोरणाकडे असतील. सेंट्रल बँकही यूएस फेडचे अनुसरण करते आणि व्याजदर वाढवते का हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

Share Market Today
Jagsonpal Pharmaceuticals : जगसनपाल फार्मास्युटिकल्स

तांत्रिकदृष्ट्या इंट्राडे चार्टवर निफ्टीने लोअर टॉप तयार केला आहे, जो मोठ्या प्रमाणात नकारात्मक आहे. पोझिशनल ट्रेडर्ससाठी 20-दिवसांच्या एसएमए किंवा 19580 पातळीजवळ सपोर्ट दिसतो.

निफ्टी यावर टिकून राहिल्यास पुन्हा 19800 च्या दिशेने तेजी जिसून शकते. या पलीकडे, बाजारात 19900 पर्यंत वाढ दिसू शकते. पण 19580 च्या खाली घसरल्यास पुढील विक्री शक्य आहे आणि निफ्टी 19450-19400 च्या दिशेने खाली सरकू शकतो.

Share Market Today
निवड दमदार शेअरची

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • बीपीसीएल (BPCL)

  • टीसीएस (TCS)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • पीएनबी (PNB)

Share Market Today
Tata Technologies IPO: 20 वर्षानंतर येतोय टाटा कंपनीचा IPO, तारीख आणि किंमतीसह सर्व माहिती एका क्लिकवर

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com