Share Market Today: आठवड्याच्या शेवटच्या व्यापार सत्रात कोणते शेअर्स मिळवून देतील नफा, काय सांगतात तज्ज्ञ?

गुरुवारी निफ्टी सलग आठव्या दिवशी वाढीसह बंद झाला आहे.
Share Market Investment Tips
Share Market Investment TipsSakal

Share Market Investment Tips: गुरुवारी निफ्टी सलग आठव्या दिवशी वाढीसह बंद झाला आहे. सेन्सेक्स, निफ्टी आणि मिडकॅप इंडेक्स विक्रमी उच्चांकावर बंद झाले. ऑटो इंडेक्सही विक्रमी पातळीवर बंद झाला आहे.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 339.60 अंकांनी अर्थात 0.52 टक्क्यांनी वाढून 65785.64 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 98.80 अंक म्हणजेच 0.51 टक्क्यांच्या वाढीसह 19497.30 च्या पातळीवर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

गुरुवारी अनेक आशियाई आणि युरोपीय बाजारात कमजोरी दिसून आल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले.

पण असे असूनही, आमच्या बेंचमार्क इंडेक्सध्ये चांगली तेजी दिसून आली. व्यापक आधारित खरेदीमुळे इंडेक्सेसने नवा उच्चांक गाठला.

तांत्रिकदृष्ट्या, मजबूत ओपनिंगनंतर, निफ्टी आणि सेन्सेक्सने 19435/65675 चा शॉर्ट टर्म रेझिस्टन्स यशस्वीपणे पार केला. पुढे, ब्रेकआऊटनंतर आणखी तेजी दिसली.

पुढे डेली चार्टवर, इंडेक्सने बुलिश कँडलस्टिक तयार केली आहे आणि इंट्राडे चार्टवर हायर बॉटम फॉर्मेशन केले, जे वर्तमान पातळीपासून आणखी चढ-उताराचे संकेत देते.

आता व्यापार्‍यांना 19375/65350 वर सपोर्ट दिसत आहे. हे असेच चालू राहिल्यास बाजारात वरच्या बाजुला 19575-19625/66000-66100 ची लेव्हल दिसू शकते.

दुसरीकडे, 19375/65350 च्या खाली घसरल्यास अपट्रेंड कमकुवत होईल. असे झाल्यास बाजारात 19325-19300/65150-65000 ची इंट्राडे करेक्शन पाहायला मिळेल.

Share Market Investment Tips
Dhirubhai Ambani Story: धीरूभाई अंबानींनी माती विकून असे कमावले होते पैसे, IPO आधी 3 वेळा बदलले होते रिलायन्सचे नाव

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • ए यू बँक (AUBANK)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Share Market Investment Tips
manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या अशांतपर्वाचा घटनाक्रम जाणून घेऊया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com