Share Market Today: बाजार अस्थिर असताना इंट्राडेमध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल?

Share Market Tips: सोमवारी निफ्टीमध्ये बराच चढ-उतार दिसून आला
Share Market
Share MarketSakal
Updated on

Share Market Investment Tips: सोमवारी बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाला. व्यवहाराच्या अखेरीस बाजार सपाट बंद झाला. सेन्सेक्स 15 अंकांनी वाढून 66 हजार 24 वर बंद झाला तर निफ्टी 19 हजार 675 वर बंद झाला.

सोमवारी सर्वाधिक खरेदी रियल्टी, बँकिंग आणि पीएसई शेअर्समध्ये झाली. त्याचबरोबर आयटी आणि फार्मा शेअर्सवर दबाव दिसून आला. बँकिंग शेअर्समध्ये काही खरेदी दिसून आली ज्यामुळे निफ्टी बँक 154 अंकांनी वाढून 44,766 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

सोमवारी निफ्टीमध्ये बराच चढउतार दिसून आला आणि शेवटी तो सपाट बंद झाल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. अशा परिस्थितीत, डेली चार्टवर एक डोजी पॅटर्न तयार केला. डोजी पॅटर्न बाजारातील दिशाहीनता दर्शवतो. निफ्टी 19,600-19,650 च्या सपोर्टच्या आसपास व्यवहार करत आहे. गेल्या काही ट्रेडिंग सत्रांमधील तीव्र घसरण लक्षात घेता, आता पुलबॅकची शक्यता आहे.

आवर्ली मोमेंटम इंडिकेटरवर पॉझिटीव्ह डायव्हर्जंस आणि पॉझिटीव्ह क्रॉसओव्हर दिसत आहे, ज्यामुळे पुलबॅकची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत. हा पुलबॅक 19,820-19,880 पर्यंत जाऊ शकतो. निफ्टीला 19,600 - 19,620 वर मोठा सपोर्ट आहे. तर 19,820 - 19,880 ची लेव्हल रझिस्टंस म्हणून काम करू शकतो.

Share Market
Delta Corp: एक टॅक्स नोटीस अन् कंपनीला 50 मिनिटांत 937 कोटींचा फटका! नेमकं प्रकरण काय?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • ट्रेंट (TRENT)

  • पीएनबी (PNB)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

Share Market
Delhi HC: कर्जदारांना मोठा दिलासा! बँकांच्या कर्ज वसुलीबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com