Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या

गुरुवारी सर्वात मोठी घसरण आयटी, ऑटो आणि बँकिंग शेअर्समध्ये झाली.
Share Market
Share MarketSakal

Share Market Investment Tips : गुरुवारी विकली एक्सपायरीच्या दिवशी बाजारात विक्री दिसून आली. सेन्सेक्स 502 अंकांनी घसरून 58909 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 129 अंकांनी घसरला आणि 17322 वर बंद झाला.

गुरुवारी सर्वात मोठी घसरण आयटी, ऑटो आणि बँकिंग शेअर्समध्ये झाली. निफ्टी बँक 308 अंकांनी घसरून 40390 वर बंद झाला. एफएमसीजी आणि इन्फ्रा शेअर्समवरही दबाव दिसून आला.

त्याचबरोबर रिअल्टी आणि सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली. तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स एका रेंजमध्ये ट्रेड करताना दिसले. त्याचवेळी मिडकॅप 97 अंकांनी घसरून 30487 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी कमजोरीसह खुला झाल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. दिवसभर जसजसा व्यापार वाढत गेला तसतसा कमजोरी वाढली. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 129 अंकांनी घसरून बंद झाला. बुधवारच्या तेजीनंतर बाजारात नवीन खरेदी झाली नाही.

निफ्टी 17345 च्या खाली बंद झाला. बाजारातील कमजोरी सुरू राहण्याची ही चिन्हे आहेत. आता निफ्टीला 17336 - 17300 वर सपोर्ट दिसत आहे. निफ्टीने हा सपोर्ट कायम राखणे अपेक्षित आहे.

Share Market
Sensex : निर्देशांकांची पुन्हा घसरगुंडी; सेन्सेक्स एकोणसाठ हजारांखाली

एका दिवसाच्या तेजीनंतर बाजारात पुन्हा विक्री झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी यांचे म्हणणे आहे. आशियाई बाजारातून मिळालेल्या कमकुवत संकेतामुळे बाजारावर दबाव आला. आता पुढील कोणतीही पडझड टाळण्यासाठी निफ्टीला नजीकच्या काळात 17255 च्या खाली जाणे टाळावे लागेल. दुसरीकडे, निफ्टीसाठी 17440-17468 वर रझिस्टंस दिसून येत आहे.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • मारुती (MARUTI)

  • एक्सिस बँक (AXISBANK)

  • टीसीएस (TCS)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • इन्फोसिस (INFY)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • पेज इंडिया (PAGEIND)

  • झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

  • एल अँड टी सर्व्हिसेस (LTTS)

  • श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SHRIRAMFIN)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Share Market
बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com