Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या

Share Market Investment Tips : मंगळवारी सलग चौथ्या दिवशी बाजारात कमजोरी दिसून आली. सेन्सेक्स 337.66 अंकांच्या म्हणजेच 0.58 टक्क्यांच्या घसरणीसह 57900.19 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 111.00 अंकांच्या म्हणजेच 0.65 टक्क्यांच्या कमजोरीसह 17043.30 वर बंद झाला.

बीएसईचा मिडकॅप इंडेक्स 0.5 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याच वेळी, बीएसईचा स्मॉलकॅप इंडेक्स 0.8 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

मंगळवारी बाजारात प्रचंड चढ-उतार झाल्याचे शेअर खानचे जतीन गेडिया यांनी सांगितले. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 111 अंकांनी घसरून बंद झाला. बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली.

या चार दिवसांत निफ्टीने सुमारे 800 अंकांची घसरण केली आहे. अशा स्थितीत रिलीफ रॅलीची शक्यता नाकारता येत नाही.

मोमेंटम इंडिकेटर नेगिटीव्ह क्रॉसओव्हर देत आहे जो विक्रीचे संकेत आहे. त्याच वेळी, किंमतr विस्तारत असलेल्या लोअर बॉलिंजर बँडसह पुढे जात आहे.

जे घसरण सुरू असल्याचे सूचित करते. आता निफ्टीला 16950 वर सपोर्ट दिसत आहे. त्याच वेळी, 17380-17400 वर याच्या वर रझिस्टंस दिसून येतो.

जागतिक बाजाराच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात प्रचंड अस्थिरता होती असे मोतीलाल ओसवालचे सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले. निफ्टी मंगळवारी एकदा 17000 च्या खाली घसरला.

व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 111 अंकांनी घसरून 17043 वर बंद झाला. बाजार येत्या काळात दबावाखाली राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील अनेक बँका धोक्यात असल्याच्या बातीमीमुळे, बाजाराचे लक्ष आता गुरुवारी येणाऱ्या यूएस चलनवाढीच्या आकडेवारीवर असेल.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • अदानीपोर्ट्स (ADANIPORTS)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • टीसीएस (TCS)

  • एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • डिक्सन (DIXON)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.