Share Market Investment: आज या 10 शेअर्समध्ये गुंतवणूक करुन मिळवा जबरदस्त नफा; काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या

गुरुवारी सलग तीन दिवसांच्या तेजीला अखेर ब्रेक लागला.
Share Market Tips
Share Market TipsSakal
Updated on

Share Market Investment Tips: गुरुवारी सलग तीन दिवसांच्या तेजीला अखेर ब्रेक लागला. गुरुवारी शेअर बाजार लाल चिन्हासह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 306 अंकांनी घसरून 62921.58 वर बंद झाला. तर निफ्टी 18700 च्या खाली गेला. तर निफ्टी 72 अंकांनी घसरला असून तो 18683.90 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी तेजी आणि मंदीच्या दरम्यान फिरत राहिल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले. सलग तीन सत्रे सुरू असलेल्या या तेजीचे सेशन अखेर गुरुवारी संपले. निफ्टी घसरून खालच्या पातळीवर बंद झाला.

ट्रेडर्स आता युरोपियन सेंट्रल बँकद्वारे (ECB) दरात वाढ करण्याच्या तयारीत आहेत. खराब चिनी आर्थिक डेटाच्या स्ट्रिंगनंतर गुंतवणूकदारांना चीनकडून अर्थव्यवस्थेसाठी पॅकेजची अपेक्षा आहे.

गुरुवारी निफ्टीने बियरीश एन्गल्फीिंग पॅटर्न तयार केला. मोठ्या सलग तेजीनंतर सावधगिरी बाळगण्याचा हा पहिला संकेत असू शकतो. 18555 हा निफ्टीसाठी पुढील सपोर्ट ठरू शकतो तर 18778-18794 च्या झोनमध्ये रझिस्टंस दिसून येतो.

Share Market Tips
Edible Oil: दिलासा! खाद्य तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • विप्रो (WIPRO)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • पीएनबी (PNB)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • फेडेरल बँक (FEDERALBNK)

  • ट्रेंट (TRENT)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Share Market Tips
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com