Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

Share Market Investment Tips: सलग आठव्या दिवशी सेन्सेक्स तेजीसह बंद झाला.
Share Market
Share MarketSakal

Share Market Investment Tips: मंगळवारी शेअर बाजारात तेजी कायम राहिली. सलग आठव्या दिवशी सेन्सेक्स तेजीसह बंद झाला. त्याचवेळी निफ्टीमध्ये सलग 6 दिवस वाढ नोंदवली आहे. निफ्टी एफएमसीजी आणि फार्मा वगळता सर्व सेक्टरल इंडेक्स हिरव्या रंगात बंद झाले.

निफ्टी मेटल आणि एनर्जी इंडेक्स सर्वाधिक वाढले. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 0.4 टक्के म्हणजेच 242.27 अंकांच्या वाढीसह 61354.71 च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 0.46 टक्क्यांनी म्हणजेच 82.65 अंकांनी वाढून 18,147.65 अंकांवर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

जागतिक बाजारपेठेत मंदी असतानाही एप्रिलचे मजबूत जीएसटी आकडे देशांतर्गत बाजाराला प्रोत्साहन देत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. आयटी, मेटल आणि एनर्जी शेअर्समधील तेजीमुळे बेंचमार्क इंडेक्स प्रमुख पातळीच्या वर बंद होण्यास मदत झाली.

तांत्रिकदृष्ट्या निफ्टीने एक लहान कँडल तयार केली आहे तर इंट्राडे चार्टवर तो हायर बॉटम तयार करत आहे जे सकारात्मक संकेत आहे. 18050-18000 हा नजीकच्या काळात निफ्टीला महत्त्वाचा सपोर्ट ठरेल. 18200-18250 वर रझिस्टन्स दिसू शकतो. पण जर निफ्टी 18000 च्या खाली गेला तर आणखी काही घसरण दिसू शकते.

मंगळवारी दिवसभराच्या व्यवहारात निफ्टीने चांगला नफा दाखवला होता पण शेवटी तो लहान बॉडी स्पिनिंग टॉप बनवताना दिसल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले. 18102 चा नीचांक निफ्टीसाठी अत्यंत महत्त्वाची पातळी आहे.

निफ्टी याच्या खाली गेल्यास आणखी करेक्शन दिसून येईल. तर, वरच्या बाजूने, 18265 हा निफ्टीसाठी पुढील रझिस्टन्स असू शकतो. उताराच्या बाजूने निफ्टीला 18065-18089 च्या झोनमध्ये सपोर्ट आहे.

Share Market
Campa Cola: कॅम्पा कोलासाठी मुकेश अंबानी करणार मुथय्या मुरलीधरनसोबत पार्टनरशीप; काय आहे करार?

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • ओएनजीसी (ONGC)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

  • एनटीपीसी (NTPC)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • आयडीएफसी फर्स्ट (IDFCFIRSTB)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • ए यू बँक (AUBANK)

  • ट्रेंट (TRENT)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Share Market
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com