Share Market Closing
Sakal
Share Market
Stock Market Today : शेअर बाजार लाल रंगात बंद; इंडिगोमुळे 'या' कंपनीचे शेअर्स वाढले; तर आजचे हे 2 शेअर्स ठरले गुंतवणूकदारांसाठी सोनं
Meesho Share : शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे नुकसान होत असताना Messho शेअर्सने एकच दिवसात तब्बल 150% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. तर Aequs शेअर्सनेही चांगला रिटर्न दिला आहे.
Indian Stock Market today : बुधवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह लाल रंगात बंद झाला. आज सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांत घसरण पाहायला मिळाली. कारण अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक निर्णयापूर्वी आज गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केली.
आजच्या बाजारात सेंसेक्स 275 अंकांनी घसरून 84,391 वर, तर निफ्टीदेखील 82 अंकांनी घसरून 25,758 वर बंद झाला.

