
Share Market : मल्टीबॅगर स्टॉकचा मल्टीबॅगर रिटर्न; केवळ 2 वर्षांत 1 लाखाचे झाले 18 लाख
Share Market : शेअर बाजारात पैसे गुंतवून नफा कमावणे कोणाला नको आहे. पण त्यासाठी योग्य शेअर्समध्ये पैसे गुंतवणे महत्त्वाचे आहे. कारण शेअर बाजारात पैसे काही क्षणात शुन्यावर येऊ शकतात. गुंतवणुकीचे अनेक धोकेही आहेत.
त्यामुळे कमी वेळेत मोठा नफा मिळवता येतो. पण त्याचबरोबर तोटाही सहन करावा लागतो. तपण चांगले फंडामेंटल असणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर दमदार नफा मिळण्याची शक्यता वाढते.
आज आम्ही तुम्हाला अशा कंपनीबद्दल सांगणार आहोत जिने मागच्या वर्षात गुंतवणूकदारांना 267% परतावा दिला आहे. ही कंपनी आहे - जेनसोल इंजिनिअरिंग (Gensol Engineering) या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना अतिशय कमी काळात मालामाल केले आहे.
कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत 18 पटीने वाढ केली आहे. कंपनीची मार्केट कॅप 11.04 अब्ज आहे.
जेनसोल इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्ये गेल्या काही काळापासून घसरणीचा ट्रेंड दिसून येत आहे, तरीही त्याने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
त्याच्या गुंतवणूकदारांनी गेल्या एका वर्षात 267 टक्के इतका मोठा नफा कमावला आहे. त्याच वेळी, गेल्या 5 वर्षांत 1,324.30 टक्के नफा झाला आहे.
जून 2021 मध्ये एका शेअरची किंमत 48.75 रुपये होती, जी आज 903.15 रुपये झाली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांचा पैसा दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत 18 पटीने वाढला आहे.
याचा अर्थ असा की जर तुम्ही जून 2021 मध्ये त्याच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे18 लाख रुपये झाले असते.
जेनसोल इंजिनिअरिंग ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे जी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोलर प्रोजेक्ट्ससाठी ऑपरेशनल सर्व्हिसेस देते.
त्यांचे ऑफीसेस अहमदाबाद आणि मुंबईत आहेत आणि 18 भारतीय राज्यांमध्ये त्याची उपस्थिती आहे. तसेच सध्या केनिया, चाड, गॅबॉन, इजिप्त, सिएरा लिओन, येमेन, ओमान, इंडोनेशिया आणि फिलीपिन्समध्येही त्यांचे प्रोजेक्ट्स आहेत.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.