IPO News : गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 28 फेब्रुवारीला खुला होणार 'या' कंपनीचा आयपीओ, जाणून घ्या किंमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPO

IPO News : गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 28 फेब्रुवारीला खुला होणार 'या' कंपनीचा आयपीओ, जाणून घ्या किंमत

ResGen IPO : आयपीओमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण प्लॅस्टिक कचरा कंपन्यांसाठी सस्टेनेबल सॉल्युशन देणाऱ्या कंपनीचा अर्थात रेसजेनचा (ResGen) आयपीओ येत आहे.

हा आयपीओ 28 फेब्रुवारी 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि गुंतवणूकदार यात 2 मार्च 2023 पर्यंत त्यात गुंतवणूक करू शकता.

कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमईवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. या आयपीओसाठी 45-47 रुपये प्रति शेअरचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.

या आयपीओअंतर्गत 10 रुपयांचे फेस व्हॅल्यू असलेल्या शेअर्सची इश्यू प्राईस 28.20 कोटी आहे. या आयपीओअंतर्गत, पूर्णपणे नवीन शेअर्स जारी केले जातील, म्हणजे विक्रीसाठी कोणतीही ऑफर नाही.

गुंतवणूकदारांना किमान 3000 शेअर्ससाठी पैसे भरावे लागतील. 3000 शेअर्सच्या लॉट साइजनुसार, गुंतवणूकदारांना 1,41,000 रुपये गुंतवावे लागतील. त्याच्या शेअर्सचे वाटप 8 मार्च रोजी होणार आहे. आणि लिस्टींग डेट 13 मार्च आहे.

रेसजेन टाकाऊ प्लॅस्टिकपासून बनवलेल्या फर्नेस ऑइलला पर्याय असलेले पायरोलिसिस तेल तयार करते. कंपनी इको-फ्रेंडली प्रोडक्ट्सवर भर देत आहे. कंपनीची स्थापना 2018 मध्ये झाली.

कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. कंपनीचे लक्ष पर्यावरण बचत प्रकल्पांवर आहे. कंपनीचे प्रमोटरकरण अतुल बोरा आणि कुणाल अतुल बोरा आहेत.

या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या तारखेनुसार, प्रमोटर्सकडे एकूण 1,35,14,060 इक्विटी शेअर्स आहेत. त्यांची कंपनीत 90.24% हिस्सेदारी आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.