Share Market Tips : 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये 10% तेजी; कंपनीत गुंतवणूक करण्याचा तज्ञांचा सल्ला

सध्या एनएसईवर हा शेअर 501.65 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्याच वेळी तो इंट्राडेमध्ये 505.40 रुपयांवर पोहोचला.
Share Market
Share Market Sakal

Share Market Tips : टोरेंट पॉवरच्या (Torrent Power) शेअर्समध्ये बुधवारी सुमारे 10 टक्क्यांची मजबूत तेजी दिसून आली. सध्या एनएसईवर हा शेअर 501.65 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्याच वेळी तो इंट्राडेमध्ये 505.40 रुपयांवर पोहोचला.

डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचे निकाल चांगले आले आहेत. या काळात कंपनीच्या कंसोलिडेटेड नेट प्रॉफिटमध्ये 88 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळेच या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत टोरेंट पॉवरच्या कंसोलिडेटेड नेट प्रॉफिटमध्ये वार्षिक आधारावर 88 टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा नफा 695 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर, कंपनीला गेल्या वर्षी याच तिमाहीत 369 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

टॉरेंट पॉवरचा ऑपरेशन्समधील महसूल वार्षिक 71 टक्क्यांनी वाढून 6,443 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत 3,767 कोटी रुपये होता.

कंपनीचा एबिटा वार्षिक आधारावर 53 टक्क्यांनी वाढून 1,527 कोटी रुपये झाला आहे. पण तिमाहीत मार्जिन 240 आधार अंकांनी घसरून 22.40 टक्क्यांवर आला.

कंपनीच्या बोर्डाने गुंतवणूकदारांना स्पेशल डिव्हिडेंड 13 रुपये प्रति इक्विटी शेअर्ससह 22 रुपये प्रति इक्विटी शेअर अंतरिम डिव्हिडेंड मंजूर केला आहे. कंपनीने अंतरिम डिव्हिडेंडसाठी 22 फेब्रुवारी 2023 ही तारीख निश्चित केली आहे.

दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवमधील कामकाजातील चांगल्या कामगिरीमुळे कंपनीच्या कमाईत वाढ झाली आहे.

Share Market
Share Market Tips : गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' कंपनीचे शेअर्स देतील दमदार परतावा, तुमच्याकडे आहेत का?

टोरेंट पॉवर ही देशातील सर्वात मोठी ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीची एकूण स्थापित उत्पादन क्षमता 4,160 मेगाव्हॅट आहे. ज्यामध्ये 2,730 मेगाव्हॅट गॅस बेस्ड कॅपिसिटी, 1,068 मेगाव्हॅट रिन्यूएबल कॅपिसिटी आणि 362 मेगाव्हॅट कोळसा आधारित क्षमतेचा समावेश आहे. याशिवाय 736 मेगाव्हॅटचे रिन्यूएबल प्रोजेक्ट अंडर डेव्हलपमेंट आहेत.

हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com