Share Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; निफ्टी 22,600च्या वर, मिडकॅप निर्देशांक विक्रमी उच्चांकावर

Share Market Today: जागतिक बाजारातून मिळालेल्या कमकुवत संकेतांमुळे गुरुवारी (23 मे) देशांतर्गत बाजाराची सुरुवात सपाट झाली. निर्देशांक वाढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर मिडकॅप निर्देशांक वाढताना दिसून येत आहे. सेन्सेक्स 32 अंकांच्या किंचित वाढीसह 74,253 वर उघडला.
Share Market Today
Share Market OpeningSakal

Share Market Opening Latest Update 23 May 2024: जागतिक बाजारातून मिळालेल्या कमकुवत संकेतांमुळे गुरुवारी (23 मे) देशांतर्गत बाजाराची सुरुवात सपाट झाली. निर्देशांक वाढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर मिडकॅप निर्देशांक वाढताना दिसून येत आहे. सेन्सेक्स 32 अंकांच्या किंचित वाढीसह 74,253 वर उघडला.

निफ्टी 21 अंकांनी घसरून 22,576 वर तर निफ्टी बँक 332 अंकांनी वाढून 48,113 वर उघडला. मिडकॅप निर्देशांकाने उच्चांक गाठला आणि 14,682 वर पोहोचला.

Share Market Latest Update
Share Market Latest UpdateSakal

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी फार्मा निर्देशांक वगळता इतर सर्व निर्देशांक वाढीसह व्यवहार करत होते. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात एसबीआय लाइफ, एसबीआय, ॲक्सिस बँक, ओएनजीसी, एचडीएफसी लाइफ, इंडसइंड बँक आणि बीपीसीएल यांचे शेअर्स वधारले तर पॉवर ग्रिड, सन फार्मा, हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि डॉक्टर रेड्डीजचे शेअर्स तेजीत होते.

मेटल आणि फार्मा शेअर्स बाजाराला खाली खेचत आहेत. त्यांचा निफ्टी निर्देशांक 1-1 टक्क्यांनी घसरला आहे. दुसरीकडे, रिॲल्टी क्षेत्रातील शेअर्स बाजाराला वर नेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत आणि त्यांचा निफ्टी निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक मजबूत झाला आहे. स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्सच्या खरेदीनेही बाजाराला साथ दिली.

Share Market Today
RBI Dividend: आरबीआयने भरली सरकारी तिजोरी; 2.11 लाख कोटी रुपयांचा दिला विक्रमी लाभांश
Share Market Latest Update
Share Market Latest UpdateSakal

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 62 हजार कोटींची वाढ

एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजे 22 मे 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,15,94,033.72 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 23 मे 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,16,56,080.12 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 62,046.4 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Share Market Opening
S&P BSE SENSEXSakal

सेन्सेक्सचे 19 शेअर्स तेजीत आहेत

सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, त्यापैकी 19 शेअर्स तेजीत आहेत. SBI, L&T आणि IndusInd बँक शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, पॉवर ग्रिड, सन फार्मा आणि जेएसडब्ल्यू स्टीलमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.

Share Market Today
Tata Group: टाटा समूह विकत घेणार वॉल्ट डिस्ने कंपनीतील हिस्सा; 1 बिलियन डॉलरचा झाला करार

सध्या BSE वर 2,339 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यामध्ये 1,544 शेअर्स वाढताना दिसत आहेत, 653 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 142 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. याशिवाय 76 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 10 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले. 77 शेअर्स वरच्या सर्किटवर पोहोचले, तर 44 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com