
Stock Market Closing Today: आज गुरुवारी शेअर बाजाराने शेवटच्या काही तासांत चांगले कमबॅक केले आणि निफ्टी सुमारे 400 अंकांच्या मोठ्या वाढीसह 25,000च्या वर बंद झाला. ट्रम्प यांनी दोहामध्ये म्हटले आहे की भारताने अमेरिकेला शून्य शुल्क कराराची ऑफर दिली आहे, आजची बाजारपेठेतील वाढ या बातमीच्या आधारे झाली आहे. आज सकाळपासूनच संरक्षण शेअर्स उत्साही होते आणि त्यात प्रचंड वाढ झाली.